Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : युवकाचा आढळला मृतदेह; नातेवाइकांचा घातपाताचा संशय

Wardha News : युवकाचा आढळला मृतदेह; नातेवाइकांचा घातपाताचा संशय

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावत असलेल्या युवकाचा मृतदेह  झाडावर दुपट्ट्याने गळ्याला बांधून लटकलेल्या अवस्थेत (Wardha) आढळून आला. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृतक युवकाच्या घरच्यांनी तसेच गवळी समाज तसेच दूध व्यावसायिकांकडून करण्यात आला. याप्रकरणी रामनगर पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली. (Maharashtra News)

सदर घटना सिंदी मेघे परिसरातील आईनगरी येथे उघडकीस आली. कृतिक उर्फ वंश गळहाट (वय १९, रा. डांगे लेआऊट सिंदी मेघे) असे मृतकाचे नाव आहे. कृतिक गळहाट हा बारावीचे शिक्षण घेत होता. त्याचबरोबर त्याचा दुधाचा व्यवसाय देखील होता. शनिवारी दुपारच्या सुमारास तो त्याच्या मालकीच्या गाईंना घेऊन चारापाणी करण्यासाठी आईनगरी परिसराकडे गेला होता. मात्र, त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दुपारी आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.

कुटुंबाचा आक्रोश 

मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिवारातील सदस्यांमध्ये आक्राेश निर्माण झाला होता. माझ्या मुलाची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप मृतक वंशचे आई, वडील तसेच त्याच्या नातेवाइकांकडून केला जात होता. परिसरात चांगलीच गर्दी उसळली होती. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती रद्द करा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

SCROLL FOR NEXT