Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : मालमत्तेचा ताबा घेण्यास गेलेल्या बँक प्रबंधकास मारहाण; हिंगणघाट पोलिसात तक्रार

Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाट येथील साहील वामन मावळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राकडून हरीषोभां अग्रो पोल्ट्री फार्मच्या नावाने दीड कोटी रुपयांचे टर्म लोन घेतले होते

Rajesh Sonwane

चेतन व्यास

वर्धा : अनधिकृत बांधकाम असलेली मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यासह गेलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मुख्य प्रबंधक अविनाश सुरडकर यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणात हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

वर्ध्याच्या हिंगणघाट येथील माता मंदिर वॉर्ड येथे सदरची घटना घडली आहे. यात साहील वामन मावळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राकडून हरीषोभां अग्रो पोल्ट्री फार्मच्या नावाने दीड कोटी रुपयांचे टर्म लोन घेतले होते. मार्च महिन्यामुळे कर्ज हप्ता थकविणाऱ्याकडील वसुलीच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य शाखा प्रबंधक अविनाश ज्ञानेश्वर सुरडकर हे कर्मचाऱ्यांसह  यांच्या मालकीचे जुने व नवीन शेत सर्व्हे व शिवसुमन मंगल कार्यालयाचे पक्के बांधकाम असलेली मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी गेले होते. 

दरम्यान साहील वामन मावळे, अनिल गणपत मावळे, सूर्यकांत गणपत माळवे, वामन गणपत माळवे, अनिता माळवे यांनी मंगल कार्यालयाच्या समोर अनधिकृत विटा सिमेंटच्या भिंती बांधल्या होत्या. त्याचा ताबा हा महेश घुमडे यांना देण्यास अडथळा होत होता. यामुळे अविनाश सुरडकर यांनी जेसीबी बोलावून अनधिकृत भिंती पाडत असताना आरोपींनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून संरक्षण भिंत पाडण्याचा व ताब देण्याच्या कामात अडथळा निर्माण केला. 

शिवीगाळ करत मारहाण 

यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक यांच्यासह सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून शाखा प्रबंधक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण होत असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. यानंतर सदर मारहाण प्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

SCROLL FOR NEXT