Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Wardha News : आर्वी पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकारी जयमाला कोहळे यांच्यावर लाच स्वीकारताना वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
आर्वी (वर्धा)
: सिंचन विहिरीचे खोदकाम केल्यानंतर मजुरांच्या मस्टरचे पैसे काढण्याकरिता लाभार्थ्यांना आर्वी पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांने पाच हजार रुपयांची मागणी केली. हि रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

आर्वी (Aarvi) पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकारी जयमाला कोहळे यांच्यावर लाच स्वीकारताना वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे. तक्रारदार यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २०२३-२४ मध्ये पंचायत समिती आर्वीकडून सिंचन विहीर मंजूर झाली. तक्रारदाराने विहिरीचे खोदकाम केले. मजुरांनी जे खोदकाम केले. त्याचे मस्टर त्यांनी पंचायत समितीकडे सादर केले. ते मजुरांच्या मस्टरचे पैसे काढून देण्याकरिता सहायक कार्यक्रम अधिकारी जयमाला त्रीलोकचंद कोहळे यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कारवाई दरम्यान जयमाला त्रिलोकचंद कोहळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाच (Bribe) स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोहळे यांच्याकडून पाच हजार रुपये हस्तगत करत ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT