Anil Deshmukh Saam tv
महाराष्ट्र

Anil Deshmukh Statement : भाजप व शिंदे गटाच्या आमदारांना सांभाळण्यात सत्ताधाऱ्यांचा वेळ जातोय; माजी गृहमंत्री अनिल देशमुख

भाजप व शिंदे गटाच्या आमदारांना सांभाळण्यात सत्ताधाऱ्यांचा वेळ जातोय; माजी गृहमंत्री अनिल देशमुख

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : सरकारमधील अस्वस्थ आमदार पुढील काळात कशा पद्धतीने तोंड उघडतात हे पहा. आता तर सुरवात झाली आहे; सध्या फक्त बच्चू कडू बोलत आहे. एक एक बोलायला लागतील तेव्हा पहा. मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ असून संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांचा (NCP) आमदारांना सांभाळण्यात वेळ जातं आहे. सरकारने खाटेवाटप करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा; अशी मागणी (Anil Deshmukh) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. (Live Marathi News)

वर्धा येथे आज शरद पवार गटाकडून आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधतं होते. राज्यात सध्या खातेवाटपावरून वाद सुरु आहे. राज्यात संपूर्ण अस्थिर परिस्थिती असून सत्ताधाऱ्यांना (BJP) आमदारांना सांभाळण्यात वेळ जातं आहे. लवकर खाटेवाटप करून सामान्याच्या प्रश्नांना न्याय द्यावा. चार ते पाच दिवसांनी राज्याचे अधिवेशन आहे. खातेवाटप करून मंत्र्यांना मिळालेल्या विभागाचा अभ्यास करू द्यावा, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

भाजपचे आमदार सर्वात जास्‍त अस्‍वस्‍थ

राज्यात सर्वात जास्त अस्वस्थ हे भाजपचे आमदार आहे. १०५ भाजपचे आमदार निवडून आले. त्यातले केवळ ५ ते ६ आमदार मंत्री झाले. बाकी बाहेरचे येऊन मंत्री बनत आहे. भाजप आमदार आता खाजगीत ही भाजप पक्षाच काय चालले, आम्ही पक्षातले तसेच आहो आणि बाहेरचे येऊन पहिल्या पंगतीत बसत आहे. असं भाजप आमदार बोलत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

पुढे काय होते पहात रहा

शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी तर मंत्रीपदाची आशा सोडली. शिंदेच्या ४० आमदारांपैकी कोणालाही समावलं नाही. त्यामुळे ते सुद्धा अस्वस्थ आहे. आता हळूहळू शिंदेचे आमदार बोलू लागले आहेत; पुढील काळात काय होते पहा असा टोलाही देशमुख यांनी लागवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

World Cancer Day : पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाटतोय? घाबरू नका! डॉक्टरांचा सल्ला वाचा अन् टेन्शन फ्री व्हा

राजकारणात भूकंप! मध्यरात्री भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT