Bribe ACB Trap Saam tv
महाराष्ट्र

ACB Trap : महसूलदिनीच नायब तहसीलदारावर एसीबीचा ट्रॅप; शेतकऱ्याकडून स्विकारली तीन हजाराची लाच

महसूलदिनीच नायब तहसीलदारावर एसीबीचा ट्रॅप; शेतकऱ्याकडून स्विकारली तीन हजाराची लाच

Rajesh Sonwane

चेतन व्यास

वर्धा : महसूल दिनाचा कार्यक्रम धुमधडाक्यात सुरु असतानाच देवळी येथील निवासी नायब तहसीलदाराने कार्यक्रम आटोपताच शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही (Wardha) कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकारी कर्मचाऱ्यांनी देवळी येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. किशोर शेंडे (वय ५१) असे अटक केलेल्या लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे. (Live Marathi News)

वर्धा येथील मास्टर कॉलनी येथील रहिवासी तक्रारदार शेतकरी हा आपसी वाटणीपत्र तयार करण्याचे काम होते. त्यासाठी तो वारंवार तहसील कार्यालयाच्या येरझऱ्या मारत होता. मात्र, आपसी वाटणीपत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे याने १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपयांत सौदा पक्का झाला. तीन हजार रुपये पहिले आणि पाच हजार रुपये नंतर देण्याचे ठरल. 

पैसे घेताच ताब्यात 

सर्वत्र महसूल दिवस साजरा होत असतानाच नायब तहसीलदार शेंडे याने तक्रारदाराला तहसील कार्यालयात पैसे घेऊन बोलाविले. तक्रारदाराने जवळील तीन हजार रुपयांची रक्कम शेंडे याला देताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात अटक लाच स्विकारताना नायब तहसीलदारास अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT