Wardha News  Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : कैलाश खैरच्या कार्यक्रमात अवकाळी पावसाची हजेरी, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन, हजारो खुर्च्या गायब

Wardha Latest News : पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला. या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास, वर्धा

kailash khair News:

वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले. पण पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला. या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)

कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती. हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला. वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.

नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या.

डेकोरेशन मालक काय म्हणाले?

डेकोरेशन मालक दिलीप भातकुलकर यांनी आवाहन करताना म्हटलं की,या कार्यक्रमासाठी बारा हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. यापैकी एक हजाराच्या जवळपास खुर्च्या नागरिकांनी पळवून नेल्या. नागरिकांनी नेलेल्या खुर्च्या परत कराव्यात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT