Wardha Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Wardha Crime News: खळबळजनक! सोशल मीडियामुळे ओळख, मैत्रीचं प्रेमात रुपांतर; अत्याचार करून विहिरीत ढकललं

Friendship turns Violent: सहा महिन्यात सोशल माध्यामात भेट घडली. नंतर मैत्री वाढत गेली. नंतर तरूणानं तरूणीवर जबरदस्ती केली आणि शेवटी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

चेतन व्यास, साम टीव्ही

सहा महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर झालेली ओळख थेट अत्याचार करत जीवे मारण्याच्या प्रयत्नपर्यंत पोहचली. ही धक्कादायक घटना वर्ध्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फैल परिसरात घडलीय. सहा महिन्यात सोशल माध्यामात भेट घडली. नंतर मैत्री वाढत गेली आणि तरूणानं तरूणीवर जबरदस्ती केली. शेवटी तरूणानं जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरूणीची ओळख, वर्धेच्या स्टेशन फैल येथील झूबेरसोबत झाली. त्या दोघांची ओळख सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर झाली होती. इंस्टाग्रामवरील ओळख ही मैत्रीत होत दोघांमध्ये संवाद होऊ लागला. एक जानेवारीला आरोपी युवकाने तरुणीला स्टेशन फैल परिसरात घरात बोलावून घेतलं.

तरूणीला घरी बोलावून घेतल्यानंतर तिच्यावर इच्छेविरूद्ध अत्याचार करून तिला घरी परत पाठवले. दुसर्‍या दिवशी दोन जानेवारीला तरुणी आपल्या घरी मैत्रिणीसोबत असताना आरोपी हा तिच्या घरी दुचाकीवरून आला. नंतर बळजबरीने तरुणीला दुचाकीवर बसविले. हे पाहून तिची मैत्रीण सुद्धा मागे बसली. नंतर आरोपी युवकानं आपली दुचाकी थेट स्टेशन फैल परिसरात नेली.

दरम्यान तरुणीची मैत्रीण ही फोनवर बोलत असताना आरोपीने तरुणीचे कपडे पकडले आणि तिला विहिरीत ढकलून दिलं. ही बाब मैत्रिणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केला. दरम्यान तिथे क्रिकेट खेळत असलेल्या तरुणाला बोलावून तिनं मैत्रीणीला बाहेर काढले. तसेच पीडित तरूणीला सावंगी रुग्णालयात दाखल केले.

तरूणीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनी रुग्णालयात जात तरूणीचा जबाब नोंदवला. तसेच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE 3 Language Policy: इयत्ता नववीत तिसरी भाषा शिकवावी की नाही? सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं

शरद पवारांना एनडीएच्या दिग्गज मंत्र्याची खुली ऑफर; प्रकाश आंडेकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

८ तास झोपूनही थकवा जाणवतोय? या आजारांचे असू शकते लक्षण

Blood Vessels: हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यावर रात्रीच्या वेळी पायांमध्ये ही 3 प्रमुख लक्षणं दिसतात

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

SCROLL FOR NEXT