Wardha Hinganghat Theft CCTV Footage Saam TV
महाराष्ट्र

Wardha Crime News: अवघ्या ३ मिनिटांत १ लाख लंपास; हिंगणघाटात धाडसी चोरी, घटनेचा CCTV फुटेज समोर

Hinganghat Theft News: कृषी सेवा केंद्राचे शटर तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी अवघ्या तीन मनिटांत १ लाख ३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Hinganghat Theft CCTV Footage: हिंगणघाट शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कृषी सेवा केंद्राचे शटर तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी अवघ्या तीन मनिटांत १ लाख ३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरट्यांच्या शोधात पोलिस पथके रवाना झाल्याची माहिती आहे.

हिगणघाट (Wardha News) शहरातील वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या मोहता चौकात पराग कोचर यांच्या मालकीचे कृषी सेवा केंद्र आहे. सध्या खरीप हंगाम सुरु असून पेरणीची लगबग सुरु आहे. या दिवसांत कृषी केंद्रात शेतकऱ्यांची झुंबड होत असल्याने पैशांच्या मोहात चोरट्यांनी कृषी केंद्रात चोरी केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

दोन चोरट्यांनी कृषी केंद्राचे कुलूप तोडून दुकानाच्या आत प्रवेश केला एक चोरटा बाहेर देखरेखीस उभा होता. दोन्ही चोरट्यांनी गल्ल्यातील १ लाख ३ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेत तिन्ही चोरट्यांनी तेथून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यांत कैद झाला आहे.

त्यानुसार पोलिसांचे (Police) पथकं आरोपींच्या शोधार्थ रवाना झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पराग कोचर यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम करीत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT