Hinganghat police arrested a Narcotics products smuggler Saam TV
महाराष्ट्र

Wardha News: भरधाव कार दिसताच मनात शंकेची पाल चुकचुकली; तपासणी करताच पोलिसही चक्रावले

Hinganghat Crime News: हिंगणघाट पोलीस गस्तीवर असताना त्यांना पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात येणारी कार दिसली. या कारला पाहताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Hinganghat Crime News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गु्न्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशातच वर्धा शहरातील हिंगणघाट पोलीस गस्तीवर असताना त्यांना पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात येणारी कार दिसली. या कारला पाहताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारला थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये एमडी पावडर आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून कारसह एम.डी ड्रग्जस तसेच मोबाईल आणि ३,५०० रुपये रोख असा एकूण ४ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Latest Marathi News)

एमडी तस्कर सचिन मिशारकर हा नागपूर येथून एमडी पावडर हिंगणघाट (Wardha News) शहरात विक्रीसाठी आणत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मनसे चौकात सापळा रचला पांढऱ्या रंगाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता एका प्लास्टीक डब्बीमध्ये एकुण ७ ग्रॅम ८७० मिली ग्रॅम वजनाची एमडी (मॅफेड्रान) पावडर मिळून आले.

सदरील कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राम खोत, हमीद शेख, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, नितीन ईटकरे, प्रदीप वाघ, पवन पन्नासे, अखिल इंगळे यांनी केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

SCROLL FOR NEXT