Wardha Collector Dance Saam TV
महाराष्ट्र

Wardha Collector Dance: जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा; कर्मचाऱ्यांसोबतचा झिंगाट डान्स व्हायरल

वर्ध्यात महसूल विभागाचा दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

वर्धा : आयएएस-आयपीएस अधिकारी म्हटलं की कडक शिस्त अशी प्रतिमा आपल्या डोळयासमोर येते. पण अधिकारी देखील कधी कधी आनंदाचे क्षण शोधत असतात. वर्ध्यात महसूल विभागाचा दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डीजेच्या तालावर महसूल विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला. यात वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांनीही सहभाग घेतला.जिल्हाधिकारी यांचा डान्स पाहूण उपस्थित सर्वांनीही त्यांना साथ दिली. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

झिंगाट, सामी, मुंगडा या गाण्ंयावर डान्स करताना जिल्हाधिकारी दिसले. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या नृत्यात जिल्हाधिकारी यांनी सहभागी होत सर्वांची मने जिंकली.जिल्हाधिकाऱ्यांसोबत अप्पर जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार यांनीही ठेका धरला होता.

या महोत्सवादरम्यान रस्सीखेच स्पर्धा सुद्धा घेण्यात आलीय. यात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वात अधिकारी तर दुसरीकडे कर्मचारी होते. या स्पर्धेत कर्मचाऱ्यांनी बाजी मारलीय.कार्यक्रमाचे नियोजन हे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे आणी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT