Prakash Ambedkar : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का? प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस...'

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यावर मोठं भाष्य केलं आहे
Prakash Amebdakr
Prakash Amebdakr Saam Tv

अमर घटारे

prakash Ambedkar News : शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्यावर मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

Prakash Amebdakr
Mumbai : ठरलं! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार; उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मी आज अमरावतीला आहे. येथून नागपूरला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात बोलणी चालू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं फायनल झालं की घोषणा होईल. ठाकरे यांना वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊ. जेव्हा त्यांची बोलणी झाली की मग निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आंबेडकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्याच्या एका वक्तव्यावर देखील भाष्य केलं. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहे की तिसरं इंजिन लावू, त्यामुळे ते राष्ट्रवादी की मनसेमधील एक लावणार? याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच सांगतील, असे आंबेडकर पुढे म्हणाले.

महायुतीत सामील होण्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं. आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपूर्वी पुरतं मर्यादित राहावं अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यांची ती भूमिका आम्हाला मान्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं'.

Prakash Amebdakr
Sanjay Raut | तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम राजकीय - संजय राऊत #SanjayRaut #breakingnews #Shivsena

दरम्यान, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेनंतर महायुतीमधील वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात,हे पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com