Wardha Accident Saam tv
महाराष्ट्र

Wardha Accident: ओव्हरटेकच्या नादात टिप्परची रिक्षाला धडक; दोघे ठार, तीन गंभीर जखमी

Wardha News : भरधाव येत असलेल्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणे व घाईत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : पढेगावकडून वर्ध्याकडे येत असलेल्या रिक्षाला समोरुन भरधाव येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या (Accident) अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Wardha) अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी धाव घेत जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. (Tajya Batmya)

सदर अपघात वर्धा ते देवळी रस्त्यावर झाला. रिक्षा चालक दिनेश नारसे हा पढेगाव येथून प्रवाशांना बसवून वर्ध्याकडे येत होता. दरम्यान समोरुन भरधाव येत असलेल्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणे व घाईत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा होत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमींना केले रुग्णालयात दाखल 

या अपघातात आकाश किसना मांजरे (रा. सालोड), बालकृष्ण सायंकार (६९ रा. पढेगाव) अशी मृतकांची नावे आहेत. तर रुपाली अमोल झाडे (रा. सालोड), अथर्व अमोल झाडे  (वय ७, रा. सालोड), दिनेश विठोबाजी नारसे (रा. पढेगाव) हे तिघे गंभीर जखमी आहे. जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत जखमीना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे या मार्गांवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT