Wardha Accident Saam tv
महाराष्ट्र

Wardha Accident : वर्ध्यात अपघाताचा थरार; भरधाव ट्रकची कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या बसला धडक

Wardha Accident update : वर्ध्यात अपघाताची घटना घडली आहे. कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या बसला भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात १५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्ध्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. कुंभमेळ्यावरून कर्नाटकात जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसला समोरून भरधाव ट्रकने मिनीबसला जबर धडक दिली. मिनीबस आणि ट्रकच्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वर्ध्यातील नागपूर ते यवतमाळ रस्त्यावर असलेल्या नागठाणा परिसारात अपघाताची घटना घडली आहे. कर्नाटकातील हूसनाबाद येथील १५ भाविक मिनीबसने प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निघाले होते. कुंभमेळ्यात स्नान करून २३ रोजी अयोध्या येथील दर्शन करून सर्व भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते.

आज मिनीबसचा चालक विलासराव यवतमाळकडे जात होते. त्यावेळी ट्रक चालकाने मिनीबसला समोरासमारे जबर धडक दिली. या अपघातात बसमधील १५ भाविक जखमी झाले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. पोलिसांकडून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

या अपघातात प्रकाश तडाले (५८), दिलीप कालेकार (५६), मधश्री काळे (१८), अनिल कुमार डोईजोडे (६६), अरुणा कालेकार (७२), रुता डेपोझाडे (५२), प्रिती जयपराते (४०), उषाकिरण करंगडल (५६),स्वरुपा तरंडले (४०), विजयलक्ष्मी सरयान (६२), जगदीश फूकाडे (४८), नलिनी सात्रवे (६०), विलास देशमुख (३८),लता कुकडे (४३) अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

नागठाणा चौकातून पुढे यवतमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच असते. भीषण अपघात झाल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात नेले. यात मिनीबसचेही मोठे नुकसान झाले. परिणामी काही वेळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

SCROLL FOR NEXT