Badlapur News अजय दुधाणे
महाराष्ट्र

बदलापुरात प्रभाग रचनेचा आरखडा जाहीर; २४ पॅनेलमध्ये द्विसदस्यीय पद्धतीनं निवडणूक

आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

अजय दुधाणे

बदलापूर - नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज जाहीर करण्यात आला. यात २४ पॅनलमध्ये मिळून ४९ वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभाग रचनेवर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत.बदलापूर (Badlapur) पालिकेची मुदत संपून दोन वर्ष उलटली असली, तरी कोरोनामुळे निवडणूक होऊ शकल्या नाही.

हे देखील पहा -

मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Election) कामाला सुरुवात केली असून आयोगाच्या आदेशानुसार बदलापूर पालिकेने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार बदलापूर शहरात ४९ वॉर्डांचे मिळून २४ पॅनल तयार करण्यात आले आहेत. यापैकी २३ पॅनल हे २ वॉर्डांचे, तर एक पॅनल हा तीन वॉर्डांचा मिळून तयार करण्यात आला आहे. या प्रभाग रचनेबाबत १७ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून २ एप्रिल दरम्यान प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.

नव्यानं तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात दोन वॉर्ड वाढले आहेत. याआधी बदलापूर शहरात एकूण ४७ वॉर्ड होते. मात्र आता ४९ वॉर्ड झाल्यानं सत्तेची मॅजिक फिगर २४ वरून २५ वर गेलीये. अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर २ महिन्यात निवडणूका होऊ शकतील, अशी माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: धुळ्याच्या लेकीचा स्वॅगच भारी, कोण आहे ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून झोप उडेल

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT