WARANA MILK PRICE HIKE saam tv
महाराष्ट्र

गोकुळ पाठोपाठ आता वारणाचेही दूध महागलं; कधीपासून लागू होणार नवे दर? किती रुपयांनी महागनार?

Warana Milk Price Hike Latest News In Maharashtra: गोकुळपाठोपाठ आता वारणा दूध संघानेही दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दूध दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारपासून नवे दर लागू झाले असून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका.

Omkar Sonawane

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

गोकुळपाठोपाठ आता वारणा दूध संघानेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वारणा दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दूध उत्पादकांना दिलासा देतानाच ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे.

वाढता पशुखाद्य खर्च, जनावरांचे संगोपन, पशुवैद्यकीय सेवा आणि इतर उत्पादन खर्चाचा विचार करून दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वारणा दूध संघाने दिली आहे. म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गाय दूध विक्री दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढता पशुखाद्य खर्च, जनावरांचे संगोपन आणि दूध उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

वारणा दूध संघाची दूध दरवाढी संदर्भात संघाकडून दराचे परिपत्रक जारी करण्यात आले असून शनिवारपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

गोकुळ दूध दरातही वाढ

गोकुळ दूध संघाच्या प्रशासकीय काळातील तोटा भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दूध दरवाढ केली. म्हशीच्या दरामध्ये 6 रुपये तर गाईच्या दरामध्ये 4 रुपये विक्रीमध्ये वाढ केली आहे. प्रशासक काळामध्ये गोकुळ संघाला 28 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये होणारी दुधाची टंचाई यामुळे गोकुळ दूध संघाकडून दरवाढ केल्याचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ५०-६० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार– एकनाथ शिंदे

Late Night Food: रात्रीचे जेवण किती वाजता करावे? उशिरा जेवण्याची सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम!

सोन्याचा भाव घसरला, आजच लाडक्या लेकीसाठी बनवा हे 5 दागिने

Mumbai : लोणावळा-माथेरान विसरा! हिवाळ्यात मुंबईजवळील 'या' ६ निसर्गरम्य ठिकाणी प्लान करा वीकेंड पिकनिक

Health Tips : दही खाल्ल्याने खरंच वाढतो सर्दी-खोकला? हिवाळ्यात दही खाण्याबाबत तज्ज्ञांचा खुलासा

SCROLL FOR NEXT