dhananjay deshmukh on dhanajay munde saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Deshmukh: बीडमध्ये वाल्मीक कराडची 'बी टीम' सक्रिय, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा आरोप

Walmik Karads B Team active in Beed : बीडमध्ये वाल्मीक कराडची बी टीम सक्रिय आहे आणि ते सर्व मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहे, असा गंभीर आरोप संतोष देशमुख यांनी केला आहे.

Saam Tv

योगेश काशिद, प्रतिनीधी

बीड: संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक मोठा गंभीर आरोप केला आहे. वाल्मीक कराडची बी टीम बीडमध्ये सक्रिय आहेत. भेटीमधील चार नावे माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर आरोपींना सोडायला गेलेले त्यांना सहकार्य करणारे आरोपींना मदत करणारे स्पष्ट झाल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच आरोपी न्यायालयात ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना मदत करणारे आणि अवतीभवती फिरणाऱ्या लोकांची नावे त्यांनी जरी सांगितले नसले तरी ते बी टीममधील लोक मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असून वाल्मीक कराडचे देखील ते जवळचे आहेत, असा खळबळजनक आरोप देशमुख यांनी केला आहे.

बालाजी तांदळे, संजय केदार, शिवलिंग मोराळे आणि डॉक्टर संभाजी वायबसे हे चार लोक आहेत. जे वाल्मीक कराडला पोलीस ठाण्यात भेटायला जातात. तर बालाजी तांदळे हा बऱ्याचदा कराडला भेटायला गेला होता. त्याचवेळेस धनंजय देशमुख हे देखील बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांना भेटायला गेले होते. बालाजी तांदळेने मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो धनंजय देशमुखांना दाखवला होता. त्याची तक्रार देखील देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली होती. मात्र पोलीस त्यांना पकडून कारवाई का करत नाही? हा आमचा प्रश्न आहे, असे देशमुख म्हणाले.

बालाजी तांदळे याने गेवराई येथे पोलीस कोठडीत असलेले आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार आणि जयराम साठे यांना गाडी पुरवली होती तसेच पैसे देखील दिले होते. कोठडीत असताना ब्लँकेट व बिसलरी बाटल्या अशा प्रकारचे साहित्य पुरवणारी हीच टीम आहे. तरी अद्याप पोलिसांनी या लोकांना सहआरोपी का केले नाही? असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

शिवलिंग मोराळे वाल्मीक कराडला सोडण्यासाठी पुण्याच्या पाषाण येथील सीआयडी कार्यालयात घेऊन गेला होता. तर डॉक्टर संभाजी वायबसेने आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली होती, त्याचबरोबर फरार असल्याच्या काळामध्ये आर्थिक मदत देखील पुरवल्याचे समोर आले होते. डॉक्टर संभाजी वायबसे याला चौकशीसाठी सीआयडीने ताब्यात देखील घेतले होते. संजय केदार आणि वाल्मीक कराडचे काही शासकीय कामांमध्ये लागेबांधे आहेत. तरी देखील पोलीस यांना सहआरोपी करत नाही असा देखील आरोप देशमुख यांनी केला आहे. या सर्वांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT