Suresh Dhas Serious Allegations On Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad Property: पुण्यात आकाच्या ड्रायव्हरच्या नावाने फ्लॅट; वाल्मिक कराडवर सुरेश धस यांचा गंभीर आरोप

Suresh Dhas Serious Allegations On Walmik Karad : परळी शहरातील पोलीस आका आणि त्यांचे वरिष्ठ सांगितल्याप्रमाणे काम करतात. कंपन्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप सुरेश धस यांनी केलाय.

Bharat Jadhav

सरपंच देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेत. धस यांनी हत्याकांडातील आकाच्या मालमत्तेबाबत लेखाचिठ्ठा सर्वांसमोर आणला. आकाच्या नावाने पुण्यात मालमत्ता आहे. आकाच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर दुकाने मालमत्ता असल्याचा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते.

सरपंच देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झालाय. या हत्येत सहभागी असललेल्या काही आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आह. या हत्याकांडामधील खरा मास्टरमाईंडचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अटकेत असलेल्या वाल्मिक कराड, सुदर्शन घुले इतर आरोपींचा कसून चौकशी केली जात आहे. वाल्मिक कराड यांना मोक्का लागला पाहिजे. त्याच्यावर कोणाचा हात आहे त्याचा शोध घ्या, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस करत आहेत.

संतोष देशमुख यांना न्याया मिळावा यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस राज्यातील वेगवेगळ्या शहरात मोर्चा काढत सरकारवर दबाव बनवत आहेत. आज छत्रपती संभाजी नगरमधील पैठण येथे काढण्यात आलेल्या मोर्चात सुरेश धस यांनी हत्याकांडातील आकावर परत एकदा गंभीर आरोप केले. वाल्मिक कराड यांच्या नावाने पुण्यात मालमत्ता आणि दुकाने आहेत. आकाच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने दुकाने आहेत.

पुण्यात एका बिल्डरकडून ३५ कोटी रुपयांचा टेरेस घेतलाय. इतकेच नाही तर ड्रायव्हरच्या नावाने सुद्धा मालमत्ता घेतल्याचा गौप्यस्फोट धस यांनी केलाय. या फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यामुळे कराडवर ईडीची धाड पडली. ईडीच्या दरबारात हे प्रकरण गेले कारण इतकीच मालमत्ता १०० कोटींच्या वरती आहे. सुरेश धस यांनी पोलीस तपासावरही प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर आरोप केले आहेत. आका आणि त्यांचे वेगवेगळे धंदे सुरू आहेत. परळीमध्ये इराणी टोळी परळीत सक्रिय आहे.

त्या टोळीकडून पिस्तुल विक्री होते.थर्मल मधून भंगार चोरीला जाते, त्यातला पोलिसांना वाटा आणि त्यात आकाचा वाटा असतो असा आरोपही धस यांनी केलाय. परळी शहरातील पोलीस आका आणि त्यांचे वरिष्ठ सांगितल्याप्रमाणे काम करतात. कंपन्यांकडून हप्ता घेतात. यांच्या हप्त्याला कंटाळून कोरोमंडल कंपनी गेली. आता बाहेर असलेल्या आकानी त्याचे उत्तर द्यावे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, की, सावधान इंडिया सारख्या लोकांची परळीला नियुक्ती करावी, खरे पोलीस अधिकारी CID नको. सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते असं लिहावं असं धस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT