Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मीक कराडचा नवा कारनामा, सिनसृष्टीशी खास कनेक्शन; फोटो आला समोर

Santosh Deskhmukh Case: वाल्मीक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. वाल्मीक कराडचे फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन असून मुंबईतल्या बीकेसीमध्ये त्याचे ऑफिस असल्याचे सांगितले जात आहे. याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.

Priya More

योगेश काशिद, बीड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडचा नवा कारनामा समोर आला आहे. वाल्मीक कराडचे सिनेसृष्टीशी खास कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. वाल्मीक कराड फिल्म प्रोड्यूसर होता. त्याचे आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचे नवनवीन कारनामे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशामध्ये आता वाल्मीक कराड चित्रपट निर्माता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे आयडी कार्ड असून त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. बी आर जे फिल्म प्रोडक्शन या निर्मीती संस्थेचा तो सभासद असल्याचे सांगितले जात आहे. या प्रोडक्शन हाऊसचा तो आजीवन सभासद असल्याचे म्हटले जात आहे.

वाल्मीक कराड यांच्या बीकेसीमधील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचे फोटो देखील समोर आले आहेत. हे वाल्मीक कराडचे ऑफिस असल्याचे सांगितले जात आहे. हे वाल्मीक कराडचे ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. यासंदर्भात आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT