Santosh Deshmukh Case Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाईंड; कराडच सुत्रधार, मुंडे अडकणार?

Walmik Karad : सरपंच हत्या प्रकरणाला 80 दिवस पूर्ण झाल्यानंतर एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये कराड मुख्य सुत्रधार असल्याचं उघड झालंय.. या आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय? कराडमुळे आता मुंडेंच्या अडचणी वाढणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात मकोकांतर्गत अटकेत असलेला वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचं म्हटलंय.. त्यामुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराड भोवती कारवाईचा फास आवळला गेलाय. या आरोपपत्रात नेमक काय म्हटलंय? पाहूयात.

कराडच हत्येचा मास्टरमाईंड

- वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार

- आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख

- 29 नोव्हेंबर - सुदर्शनच्या फोनवरून कराडनं मागितली खंडणी

- 6 डिसेंबर -देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद

- खंडणी, अ‍ॅट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख

राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणात तब्बल 80 दिवसानंतर एसआयटीने आरोपपत्र दाखल केलंय.. त्यात हत्येतील आरोपींची नावं समोर आले आहेत..

सरपंच देशमुखांचे मारेकरी

वाल्मिक कराड - आरोपी क्रमांक 1

विष्णू चाटे - आरोपी क्रमांक 2

सुदर्शन घुले - आरोपी क्रमांक 3

प्रतीक घुले - आरोपी क्रमांक 4

सुधीर सांगळे - आरोपी क्रमांक 5

महेश केदार - आरोपी क्रमांक 6

जयराम चाटे - आरोपी क्रमांक 7

कृष्णा आंधळे - फरार आरोपी

आरोपपत्रात थेट वाल्मिक कराड मुख्य सुत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने देशमुख कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. रामायणात वाल्याचा वाल्मिकी झाला. मात्र सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा बीड जिल्ह्यातील हा वाल्या असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र हा वाल्मिक आपला निकटवर्तीय असल्याची कबुली मंत्री धनंजय मुंडेंनी दिली होती. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT