Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Walmik Karad : २ ऑफिस, ३ फ्लॅट, ३५ एकर जमीन; वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर कोट्यवधींचं घबाड, सातबाराच आला समोर

walmik karad second wife Property : वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर कोट्यवधींचं घबाड असल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर सोलापुरात कोट्यवधींचं घबाड असल्याचे समोर आलंय.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या नावावर राज्यात विविध भागात कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचे उघड होत आहे. याच वाल्मिकच्या नावावर पुण्यातही कोट्यवधींचे फ्लॅट आहेत. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावरही कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव यांच्या शेतजमिनी असल्याची माहिती हाती आली आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते.

बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी करण्यात आल्या आहेत. या जमिनींचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहेत. तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.

दोन वर्षात कालावधीत चारही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या आधी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसत आहे.

शेतातील सालगडी कामगारांवर उपासमारीची वेळ

दरम्यान, पोलिसांनी वाल्मिक कराड मुसक्या आवळ्यानंतर ज्योती मंगल जाधव जमिनीकडे गेल्याचं नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यापासून मजुरी न मिळाल्याचे खंत व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव तिच्या नावावर जवळपास ३५ एकर जमीन असल्याचं ट्विट केलं होतं.

गेल्या सात महिन्यांपासून काम करणाऱ्या माणिक शिंदे माने यांचे कुटुंब मंगल ज्योती शिंदे यांच्या शेतात काम करतं. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न केल्याचं पुढं आलं आहे. सेंद्रिय येथील शेत जमिनीवर काम करणाऱ्या शिंदे माने कुटुंबीयाला दुसऱ्यांच्या शेतात कामावर जाण्याची वेळ आली आहे. शिंदे माणिक कुटुंब गेल्या तीन महिन्यापासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर भागवण्याची भूक भागवण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT