Walmik karad Saam tv
महाराष्ट्र

Walmik Karad Property: वेगवेगळ्या शहरांत बँक अकाउंट, मालमत्ता, कोट्यवधींचे ट्रान्झॅक्शन; वाल्मिक कराडचा 'काळाचिठ्ठा' उघड

Property of Walmik Karad: सीआयडीच्या चौकशीत कराड याच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. वाल्मिक कराडच्या नावाने राज्यातील विविध शहरात बँक खाती आहेत.

Bharat Jadhav

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाची माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येतील संशयित आरोपी वाल्मीक कराडविषयी नववीन माहिती समोर येत आहे. सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यापासून आरोपी वाल्मिक कराड फरार होता. हत्येची घटना होऊन जवळपास २२ दिवसांपासून कराड फरार होता. कराडला शोधण्यासाठी सीआयडीने ९ पथकं तयार केली होती. शेवटी कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.

त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता कराडविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील विविध शहरात कराडचे बँक खाती असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कराडची वेगवेगळ्या शहरात मालमत्ता आणि बँक खाती असल्याचं सांगितलं जात आहे.

तीनचार दिवसांपासून वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सरपंच देशमुख यांच्या या हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला. कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला.

सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जवळपास २१ दिवसांपासून फरार असणारा वाल्मिक कराड शरण होण्यासाठी मोराळे यांच्यासोबत आला. शिवलिंग मोराळे यांच्या MH 23 BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून सीआयडीच्या कार्यालयात आला. शिवलिंग मोराळे आणि वाल्मीक कराड यांचे जवळचे आणि व्यावहारिक संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी दुपारी शरण आल्यानंतर सीआयडीने त्याला अटक केली. अटक केल्यानंतर सीआयडीने त्याला बीड येथे नेलं. तेथील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. अटकेत असलेल्या कराडच्या चौकशीत सीआयडीला धक्कादायक माहिती समोर आलीय. कराडच्या नावाने राज्यातील वेगवेगळ्या शहरात बँक खाती आहेत, तसेच मालमत्ता असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT