वडेट्टीवारांनी बीडमध्ये येऊन दाखवावं; धस यांनी दिले आव्हान
वडेट्टीवारांनी बीडमध्ये येऊन दाखवावं; धस यांनी दिले आव्हान विनोद जिरे
महाराष्ट्र

वडेट्टीवारांनी बीडमध्ये येऊन दाखवावं; धस यांनी दिले आव्हान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - आमदार सुरेश धस Suresh Dhas यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये Beed आज भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी भाजप सुरेश धस यांनी राज्यसरकार सह मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, विजय वडेट्टीवार म्हणतात मराठा समाजाचा आयोगच बोगस आहे. मी तर म्हणतो वडेट्टीवारचं बोगस, फडतूस आहेत. मराठा समाजाचा आयोग बोगस आहे असं म्हणत असलेले विजय वडेट्टीवार फन्टूस औलाद आहेत हे मी डायरेक्ट म्हणतो आणि वडेट्टीवारांनी येऊन दाखव आता आमच्या जिल्ह्यात, आई शप्पथ पोलिसांसह ये म्हणावं बघ आम्ही कसा सत्कार करतो अस म्हणत आमदार सुरेश धस यांनी मोर्चाच्या माध्यमातून वडेट्टीवारांना आव्हान केले आहे. Wadettiwar should in Beed Challenged by Dhas

ते पुढे म्हणाले, की या दोन वर्षात या सरकारने सर्व सवलती बंद केल्या असून सर्वांची वाट लावली आहे. जर महिनाभरात आरक्षणचा निर्णय झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढू असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आयोजित मोर्चात ते बीडमध्ये बोलत होते.

सुरेश धस यांच्या नेतृत्वातील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाला उद्देशुन बोलताना धस यांनी कोणीही मोर्चे काढल्यावर लोक येत नाहीत, त्यासाठी रोज लोकात रहावे लागते. लोकांना कोविड सेंटरला जाऊन आधार द्यावा लागतो असा टोला मारत भाषणाला सुरुवात केली. मराठा समाजाचे आरक्षण या सरकारच्या गलथानपणामुळे गेले. आरक्षण मिळायच तेव्हा मिळेल, तो पर्यंत आमच्या लेकरांची फी तरी भरा, स्थगितीपुर्वीच्या नियुक्त्या द्या अशी मागणी त्यांनी केली.Wadettiwar should in Beed Challenged by Dhas

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हे तारखावर तारखा वाढवित गेले आणि त्यातूनच हे आरक्षण गेले असा आरोप आ. धस यांनी केला आहे. ऊसतोड कामगारांसाठी कायदा, पिक कर्ज यासाठी गरज पडली तर पुन्हा मोर्चा काढु.पटोलेंच्या कार्यक्रमाला गर्दी, राष्ट्रवादीचा परिसंवाद, सेनेचे कार्यक्रम सुरु आहे यांना कोणालाच कोरोना नाही, फक्त अधिवेशनाला कोरोना आहे. हे सरकार कपट कारस्थानाने आलेल सरकार आहे असे ते म्हणाले.Wadettiwar should in Beed Challenged by Dhas

ज्या देवेंद्र फडणविसांना साडेतीन टक्के म्हणून हिणवले, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले असेही धस म्हणाले. फडणविसांवर फेक अकाउंट वरुन टिका करता, कंगणाच घरं पाडता, आ. मेटेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालता, विचार दाबण्याचा हा प्रकार असल्याची टिका देखील त्यांनी केली आहे. दरम्यान या मोर्चाला आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT