Vrushaliraje Bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara: शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा; राजधानी साता-यात वृषालीराजे आक्रमक

आज वृषालीराजे भाेसले यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनास निवेदन दिलं.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) शहरातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी तसेच मराठ्यांची राजधानीत छत्रपती संभाजीराजे (chhatrapati sambhaji maharaj) यांचे स्मारक अथवा पुतळा बसवावा अशी मागणी शाहूनगरी फाैंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भाेसले यांनी केली आहे. (vrushaliraje bhosale latest news)

दरम्यान वृषालीराजे भाेसले यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागास खरमरीत पत्र लिहून शिवतीर्थ येथील काेट्यावधीच्या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वृषालीराजे भाेसले (vrushaliraje bhosale) यांनी आज (शुक्रवार) सातारा पालिकेत आपल्या मागणांबाबतचे निवेदन प्रशासनास दिले. या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि शिवतीर्थाला शोभेल असा कलाकुसर असणारा भव्य दरवाजा बसवावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी असे नमूद केले आहे.

त्या म्हणाल्या शिवतीर्थ येथे सध्या झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काेट्यावधी रुपये खर्च हाेत असताना त्या ठिकाणी पत्र्याचे प्रवेशद्वार लावण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शाेभणारे एेतिहासिक कलाकुसर असलेले प्रवेशद्वार तातडीनं बसवावे. या बराेबरच सध्या झालेल्या कमानीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चहूबाजूंनी नागरिकांना दिसत नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे गरजेचे आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात मराठ्यांची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात छत्रपती संभाजीराजे यांचे साधे स्मारक किंवा पुतळा सुधा नसून हे अतिशय क्लेशदायक आहे. त्यामुळे ऐतिहसिक शाहूनगरीत गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजीराजे यांचे भव्यदिव्य स्मारक किंवा पुतळा उभारावा अशी मागणी शाहूनगरी फाैंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीराजे भाेसले यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

vrushaliraje bhosale with shahunagari foundation memebers.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT