सांगली - कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या (Nagar Panchyat) नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मयत व्यक्तीच्या नावे बनावट मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये मयत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याने शेतकरी विकास आघाडी व आरपीआयच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. त्यामुळे प्रभाग १० व १६ मध्ये निवडूण (Election) आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ॲड. अमित शिंदे यांनी दिली. (Sangali Latest News)
कवठेमंकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये शेतकरी विकास आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दूलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केलेली आहे. प्रभाग क्रमांक दहा मध्ये ७ मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेऊन सात मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झालेले आहे. ही बनावट सात मते मिळाल्यामुळे शिरोळकर विजय झाले आहेत.
हे देखील पहा -
पराभूत उमेदवार शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मयत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मयत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे. ज्या मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र घालून उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग १० ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक १६ मधील आरपीआयचे उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे यांनी विजयी उमेदवार संजय विठ्ठल वाघमारे व इतर पराभूत उमेदवार यांचे विरुद्ध दाद मागितली आहे.. प्रभाग क्रमांक १६ मध्ये ३ मयत व्यक्तींचे नावे बनावट मतदान झाले आहे. तसेच तीन व्यक्तींची प्रभाग १६ च्या मतदार यादी मध्ये दुबार नावे आली असून त्यांनी त्या दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे.. तसेच पुरुषाच्या ठिकाणी स्त्री चे फोटो, स्त्रीच्या ठिकाणी पुरुषाचा फोटो अशी चार चुकीची नावे असतानादेखील त्या नावावर बनावट मतदान झाले आहे असे एकूण १३ बनावट मतदान झाले असून नानासाहेब वाघमारे यांचा केवळ नऊ मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नानासाहेब वाघमारे यांना विजय घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दोन्ही तक्रारींमध्ये बनावट मतदानाचा सबळ पुरावा हजर केलेला असून निवडणूक निर्णय, अधिकारी, कवठेमंकाळचे मुख्याधिकारी यांना देखील माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये दुबार, मयत व चुकीचे मतदान रोखण्यासाठी पडताळणीची तरतूद असताना देखील त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने निवडणूक सदोष झालेली असल्याने त्यांना न्यायालयात आव्हान दिले असल्याचे तक्रारदारचे वकील अमित शिंदे यांनी सांगितले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.