हा जल्लोष आहे शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यातील... भाजपनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंमागे सगळी ताकद उभी केली... मात्र सांगोल्यातील जनतेनं जयकुमार गोरेंना चांगलाच दणका दिलाय.... सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या केलेल्या 13 पैकी 11 नगरपालिकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय... आणि विरोधकांनी हलगीच्या तालात गुलाल उधळून जल्लोष साजरा केलाय...
दिग्गजांना नाकारल्याची घटना फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही... तर नगरपालिका निवडणुकीत तब्बल 10 मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांना मतदारांनी पराभवाचे धक्के दिलेत...
मंत्री नितेश राणेंच्या हातातून कणकवली निसटली
जयकुमार गोरेंचा सोलापूरमध्ये पराभव
धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना पराभवाचा धक्का
पणनमंत्री जयकुमार रावल यांना धक्का
नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजनांच्या प्रभावक्षेत्रात फटका
मंत्री बाबासाहेब पाटलांना होम पिचवर दणका
भुसावळमध्ये संजय सावकारेंच्या पत्नीचा पराभव
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या मित्र निलेश काटेंचा पराभव
श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेसेनेचे अतुल चौगुले विजयी
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना मुक्ताईनगरमध्ये धक्का
आमदार रमेश बोरनारेंच्या भावाचाही पराभव
आमदार अमोल खताळांच्या भावजय पराभूत
आमदार प्रताप भारसाकळेंच्या पत्नीचा पराभव
शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी पराभूत
दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचा होमपिचवर पराभव
मनाला वाटेल तो उमेदवार देत मनमानी कारभार आणि जनतेकडे दुर्लक्ष केल्यास मतदार मतपेटीतून उत्तर देतात, हेच या निकालातून स्पष्ट झालंय... त्यामुळे लोकशाहीत जनतेला विश्वासात घेऊनच काम करायला हवं.. नाहीतर 5 वर्षांच्या पाहूण्याला जनता निवडणुकीत शांततेत धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, हेच खरंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.