Vishal Kaple Murder News जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola Crime News: ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची भररस्त्यात निर्घृण हत्या; थरारक Video आला समोर

Akola Crime News: घटनेचे नेमकं कारण काय? हे हत्याकांड सुपारी किलिंगमधून घडलं का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

जयेश गावंडे

Akola Crime News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला उपशहरप्रमुख विशाल कपले यांची भररस्त्यात निर्घृन हत्या करण्यात आली आहे. त्यांची हत्या करतानाचा व्हिडीओ 'साम'च्या हाती लागला आहे. गजबजलेल्या जठारपेठ चौकात दोघांकडून विशालची चाकू भोसकून हत्या (Killing) करण्यात आली. रस्त्यावरच्या गर्दीने बघ्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यात विशाल कपले हे गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. (Akola Latest News)

रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास गजबजलेल्या जठारपेठ चौकात दोघांनी विशाल यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. रस्त्यावरील गर्दी या थरारक हत्याकांडात बघ्याची भूमिका घेत राहीली. दरम्यान, अकोल्यात दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटातील शिवसेना उपशहरप्रमुखाचीही गळा आवळून हत्या केल्याचं गूढ अजूनही कायम आहे. त्यात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या झाली आहे. या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला (Akola) शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात रविवारी सायंकाळी ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन युवकांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ विशालला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. चाकू हल्ल्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन जणांचा समावेश असून हे दोघेही मोठी उमरी परिसरातील रहिवासी आहे. तरीही घटनेचे नेमकं कारण काय? हे हत्याकांड सुपारी किलिंगमधून घडलं का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. (LIVE Marathi News)

विशालला मारतांनाचा व्हिडीओ; रस्त्यावरच्या गर्दीची बघ्याची भूमिका

जठारपेठ ते मोठी उमरी परिसर हा गर्दीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील जठारपेठ चौकात ही घटना घडली. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, रविवारी म्हणजेच ३० ऑक्टोंबरला सायंकाळी विशाल उमरी परिसरातून जठारपेठकडे रवाना झाला, त्यावेळी विशालचे मारेकरी हे त्याचा पाठलाग करत होते.

रस्त्यावरील भर चौकात विशालला थांबून तोंडाला रुमाल बांधून आलेले युवकांनी त्याच्यावर चाकूने वार केले. इथेच न थांबता चाकू हल्ल्यानंतरही विशालला तोंडावर लाथा मारल्या आणि त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. अकोल्यातील गजबजलेल्या जठारपेठ चौकात विशालची चाकू भोसकून हत्या होत असताना रस्त्यावरच्या गर्दीची बघ्यांची भूमिका राहली. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजवनी पुंडगे करीत आहे. (Tajya Batmya)

चाकूच्या नादात चाकूनेच विशालची हत्या

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशालने शिवानंद याच्या नावावर ऑनलाइन चाकू खरेदी केला होता, मात्र चाकू शिवानंदपर्यंत पोहोचला नाहीये, त्यातून विशाल आणि मारेकऱ्यांमध्ये नेहमी वाद व्हायचा. तसेच त्यांच्यात जुना वादही होता. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसात अदखल पात्र गुन्हा नोंद आहे. चाकूच्या नादातूनच आता विशालची चाकू भोकसून हत्या झाल्याच समजत आहे. तरीही मारेकर्‍यांनी विशालला का मारलं? विशालला मारण्यासाठी कुणी जिवे मारण्याची सुपारी दिली का? याचा तपासही पीएसआय संजीवनी पुंडगे करीत आहेत. (Maharashtra News)

विशालने उठवला होता उमरी परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज

विशाल कपले हे उमरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत होते. अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच रक्तदानासारख्या उपक्रमात ते सदैव अग्रेसर असायचे. अलिकडेच मोठी उमरी, गुडधी परिसरात अनेक हॉटेलवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबतही त्यांनी आवाज उचलला होता. यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनंही त्यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यातून अनेकजण विशालवर नाराज होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT