Virar News Heart Attack Saam tv
महाराष्ट्र

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; मुलाच्या निधनाने वडिलांचाही हृदयविकाराने मृत्यू

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; मुलाच्या निधनाने वडिलांचाही हृदयविकाराने मृत्यू

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार : विरारमध्ये दांडिया खेळताना एका पस्तीस वर्षे तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयात (Hospital) नेण्यापूर्वीच निधन झाले. (Virar News Heart Attack Death)

विरार (Virar) पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये (Navratri Festival) नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्‍यान शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीष जैन (वय ३५) या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन आणि भाऊ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीष जैन याचा मृत्यू झाला.

अन्‌ वडिलांनाचा मृत्‍यू

मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन (वय ६५) यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जैन कुटुंबांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT