सुदेश चौधरी SaamTvNews
महाराष्ट्र

विरार गोळीबार प्रकरण, एकाचा झाला होता मृत्यू; शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

या गोळीबारामध्ये समय चौहान नावाच्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार : विरार मधिल माजी बहुजन विकास आघाडीचे स्थायी समिती सभापती व नुकताच शिवसेना (Shivsena) पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सुदेश चौधरी यांच्यावर विरार मधील फायरिंग (Firing) प्रकरणी चौधरी यांच्यासह नऊ लोकांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा :

सुदेश चौधरी (Sudesh Chaudhari) यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. याप्रकरणीसुदेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता असता, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, पोलीस तपासात जे निष्पन होईल त्याला मी सामोरे जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी फोन वरून दिली.

नेमकं प्रकरण काय आहे?

विरार (Virar) पूर्व मधील 90 फुटी रोड वर शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास समय चौहान या तरुणावर अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. या घटनेत एकूण चार राऊंड फायर केले होते. फायरिंग करून 2 अज्ञात आरोपी दुचाकी वरून फरार झाले होते. या गोळीबारामध्ये समय चौहान नावाच्या नालासोपाऱ्यात (Nalasopara) राहणाऱ्या एका तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तपासानुसार, बहुजन विकास आघाडीचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह आणखी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता पोलीस तपासात जे निष्पन्न होते हे पाहणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT