Whale Fish Viral News : विरामधील अर्नाळा समुद्र किनारी प्रकाश नावाची बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीसमोर मच्छीमारांना दुर्मिळ जातीचा देव मासा आढळून आला. देव मासा दिसल्याने मच्छीमारांना देखील आनंद झाला. दुर्मिळ जातीचा देव माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद खारखंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी अर्नाळ्याच्या खोल समुद्रात (Sea) गेले होते. त्याचवेळी त्यांच्या बोटीसमोर भुकेला देव मासा आला. या देव माशाला पाहून बोटीतील मच्छीमारांना दया आली. त्यांनी तातडीने बोटीमधील पकडलेले बोंबील, मांदेली व कोळंबी असे दोन कॅरेट असे मासे बोटवरील मच्छीमारांनी देव माशासमोर टाकले. या देव माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बोट मालकाने दिलेल्या माहितीनुसार हा मासा थकलेल्या अवस्थेत होता. या आधी देखील भाईंदर उत्तानमधील एका बोटीच्या जाळ्यात देव मासा (Fish) अडकला होता. त्यावेळी जाळे कापून त्या देव माशाला समुद्रात सोडण्यात आले होते.
मोठे दुर्मिळ मासे क्वचित आढळतात. मोठे दुर्मिळ मासे मच्छीमारांच्या जाळ्यात मरत नाही. परंतु दुर्मिळ मासे पकडणारे मच्छीमार लखपती झाल्याशिवाय राहत नाही. काही मासे हे औषधी गुणधर्म असणारे असतात. काही दुर्मिळ माशांच्या शरीरामधला भागाने ऑपरेशनचा दोरा बनविण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे दुर्मिळ माशांना सोन्यापेक्षा अधिक किंमत असते. त्यामुळे काही माशांना बाजारात भरपूर किंमत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.