Ahmednagar News Viral Video Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News: लाडक्या गुरूजींची १२ वर्षानंतर बदली! विद्यार्थीच नव्हे अन् अख्खं गाव रडलं; ह्रदयस्पर्शी VIDEO...

Ahmednagar Pathardi Teacher Transfer: या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट केला आहे.

Gangappa Pujari

Amhednagar News: गुरू शिष्याचं नात सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ नातं समजलं जातं. विद्यार्थ्यांच्या अंधारमय आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडणारे, शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य देणारे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असतात. अशा लाडक्या शिक्षकांची बदली झाली की प्रत्येकाला वाईट वाटतचं.

पण अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील एका शिक्षकांच्या बदलीने फक्त विद्यार्थीचं नव्हेतर गावकरीही रडल्याचे पाहायला मिळाले. या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ट्वीट केला आहे..

१२ वर्षांनी झाली बदली...

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लहू विक्रम बोराटे यांची तब्बल १२ वर्षांनी बदली झाली. ही शाळा उसतोड कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जायची. या १२ वर्षाच्या काळात बोराटे सरांनी या शाळेचा कायापालट केला..

विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच डिजीटल जगताची ओळख होण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. डीजिटल शाळा, हस्ताक्षर स्पर्धा, हरित शाळा, तसेच शाळेला 3d पेंटिंग अशा अनेक उपक्रम त्यांनी मुलांसाठी सुरू केले.

१२ वर्षात शाळेचा कायापालट..

त्यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर अनेक पुरस्कारही पटकावले.. १२ वर्ष प्रामणिकपणे प्रेरणास्थान होवून त्यांनी दिवसरात्र काम केले. या गावातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि नागरिकाच्या जणू ते घरातील सदस्याप्रमाणे बोराटे सर वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या बदलीच्या बातमीनंतर संपूर्ण गाव जणू दुःखात बुडाले होते. त्यांची १८ मे २०२३ ला हनुमाननगर शाळेमधून बदली होवून ते धनगर वस्ती तालुका जामखेड या ठिकाणी रुजू झाले. 

निरोप समारंभ...

आपल्या लाडक्या बोराटे सरांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, आजी- माजी विद्यार्थ्यांसह अख्ख गाव लोटले होते. मुलांना भाषण करताना आलेले हुंदके, सरांचे कौतुक करताना सहकाऱ्यांना कोसळलेले रडू अन् गावातील प्रत्येकजण सरांची आठवण सांगून भावूक होताना पाहायला मिळाला.

व्हायरल व्हिडिओ...

या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला आहे. लळा असा लावावा की शिक्षकाच्या निरोपावेळी फक्त शाळेतील विद्यार्थीच नाही, तर गावातील गावकऱ्यांनाही गहिवर दाटून यावा! अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या निरोप समारंभाचे हे दृश्य हेलावून टाकणारे आहे. असा सुंदर कॅप्शन देत शेअर केलेला हा व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT