Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video: डोक्यावर पांढरी टोपी अन् अंगात पांढरा शर्ट; तरुणाईला पाठी सारत रंगला आजोबांचा दांडिया; पाहा VIDEO

Old Man Video: सध्या सोशल मीडियावर काही आजोबांचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Navratri Special: सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धुम पाहण्यास मिळत आहे. कुठे मोठ- मोठ्या जत्रा नवरात्री उत्सवानिमित्ताने भरलेल्या आहेत. तर महिला वर्गाची विविध रंगाची कपडे परिधान करून गरबा खेळण्याची इच्छा पूर्ण होताना दिसून येत आहे. लहान मूलांपासून ते तरुणाई रात्रा उशिरापर्यंत गरबा आणि दांडिया खेळत आहे. अशा नवरात्री निमित्ताने सोशल मिडियावर काही आजोबांचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता काही वयोरुद्ध व्यक्ती दिसत आहेत. पुढे जस जसा व्हिडिओ जातो तस तसा काही वयोरुद्ध व्यक्तींचा ग्रुप बनतो मग काय एका बाजूला नवरात्री(Navratri) निमित्ताने दांडिया आणि गरब्याची गाणी सुरू असतात या गाण्याच्या ठेक्यावर काही आजोबा दांडिया खेळत आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहिले तर सर्वांनी सफेद रंगाचे कपडे परिधान केलेली आहेत आणि डोक्यावर सफेद रंगांची टोपी घातलेली आहे. एका तालात आणि एका ठेक्यावर सर्व आजोबा दांडिया खेळत आहेत. आजू बाजूला असलेल अनेक नागरिक त्यांना पाहत आहेत, अशातील एका व्यक्तीने आजोबांचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील कुठल्या गावातील आहे हे माहिती नाही. मात्र व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@marathi_epic_jokes'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवर एका दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला आहे.

इन्स्टाग्रावरील व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस आलेला दिसून येत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच काही तासातच व्हिडिओला तब्बल ८० हजार हुन अधिक नेटकऱ्यांनी लाईक केलेले आहे तर अजूनही व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका महिला यूजरने लिहिले आहे की,''व्हिडिओ आवडला राव'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''संस्कृती..एकही आजोबा टोपी शिवाय नाहीये'' तर ''लयबद्ध तालबद्ध नृत्य सादर केले आहे अप्रतिम क्षणचित्र ठेवा'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.-

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT