Bus Conductor Viral Video Saam tv
महाराष्ट्र

ST Bus Viral Video: हाफ तिकिटवाल्यांमुळं एसटी फुल्ल! कंडक्टर बनला सुपर हीरो, तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

ST Bus Concession: एसटी प्रवासात सवलत मिळतेय म्हटल्यावर महिला मोठ्या संख्यने प्रवास करताना दिसत आहेत.

Chandrakant Jagtap

Bus Conductor Viral Video: राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोणातून एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महिला वर्गात प्रचंड उत्साह आहे.

तसेच शासनाच्या या निर्णयाचा महिला वर्ग जोरदार फायदा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एसटी प्रवासात सवलत मिळतेय म्हटल्यावर महिला मोठ्या संख्यने प्रवास करताना दिसत आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु या व्हिडिओतील कन्डक्टरची सुरु असलेली तारेवरची कसरत पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. (Viral Video)

एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळ्यानंतर बसमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. महिलांनी भरगच्च भरलेल्या या एसटीत कंडक्टर चक्क सीटांवरून चालत तिकीट काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसणारी एसटी बस कुठली आहे आणि हा व्हिडिओ नेमका कुठला हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु या व्हिडिओत बसमध्ये महिलांची तुडुंब गर्दी आणि बस कंडक्टरला करावी लागत असलेली तारेवरची कसरत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. (Latest Marathi News)

येथे पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिरूर हवेली विधानसभेत शरद पवारांची आघाडी

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT