Viral CCTV Video saam tv
महाराष्ट्र

CCTV Video: घरातून निघाला, लिफ्टचं बटन दाबलं अन् धाडकन कोसळला; धडधाकट व्यक्तीचा क्षणात मृत्यू

Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्यक्तीच्या मृत्यूवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Chandrakant Jagtap

Viral Video: सध्याच्या धावपळीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा जीमध्ये, खेळताना आणि चालत चालता लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही वेळा अशा घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका धडधाकट व्यक्ताचा क्षणात मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडते, दरवाजा लावते आणि लिफ्टचं बटन दाबते. परंतु अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागते आणि हवा मिळावी म्हणून तो खिडकीतून बाहेर डोकावून बघण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यानंतर काही सेकंदाच त्याचा मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना अवघ्या काही मिनिटात घडते. (Viral video)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्यक्तीच्या मृत्यूवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढ्या धडधाकट व्यक्तीचा काही क्षणात मृत्यू होऊ शकतो यामुळे काही यूजर्स भीती व्यक्त करत सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. यापूर्वी देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या अशा अनेक प्रसंगांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. (Viral News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT