illegal sand mining  Saam tv
महाराष्ट्र

वाळू तस्कराच्या रिलने भांडं फुटलं, प्रशासन अॅक्शन मोडवर; थेट कायद्याचा बडगा उगारला

illegal sand mining : वाळू तस्कराच्या रिलने भांडं फुटलं आहे. यामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. मकोका , NDPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

Vishal Gangurde

वाळू तस्कराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तस्कराचं प्रशासनाला थेट आव्हान

प्रशासनाकडून कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात वाळू तस्कराने सोशल मीडियावर रिल व्हायरल करत प्रशासनाला थेट आव्हान दिल्यानंतर महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर थेट मकोका आणि NDPA कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे वाळू तस्कराने प्रशासनाला आव्हान देणारा आणि स्थानिकांवर दहशत निर्माण करणारा रील व्हायरल केला होता.. त्यामुळे प्रशासनाला न जुमानता संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांचा सुरू असलेला हैदोस समोर होता.. माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून वाळू तस्करांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नदीपात्राकडे जाणारे रस्ते खोदून बंद करण्यात आलेत, तर सहा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आलेत. अवैध वाळू उपसा करणाऱ्या आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात थेट मकोका आणि NDPA कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.. वाळू तस्करी करणारे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे आमदार खताळ यांनी म्हंटलय. संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने सुरू केलेली कारवाई केवळ फार्स ठरू नये एव्हढीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकारावर प्रशासन काय कारवाई करते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीआधी EVM मुद्दा पेटला, धाराशिवमध्ये महामार्गावर टायर पेटवले, VIDEO

India Tourism : भारतातील 'हे' ठिकाण जणू पॅरिसच; हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त जबरदस्त भाषण; स्टेजवर मुलांसाठी होईल टाळ्यांचा कडकडाट

Shocking: बायकोचे १०० पुरूषांसोबत शरीरसंबंध, नवरा गुपचूप व्हिडीओ काढायचा; खतरनाक रॅकेटमागची स्टोरी वाचून हादरून जाल!

SCROLL FOR NEXT