दिग्रसमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; हातात शस्त्रे घेऊन घातला राडा! संजय राठोड
महाराष्ट्र

दिग्रसमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; हातात शस्त्रे घेऊन युवकांचा राडा!

दिग्रस शहराचे महान तपस्वी संत श्री घंटीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार (८ नोव्हेंबरला) रात्री १० वाजताच्या सुमारास यात्रेमध्ये दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीने चांगलीच खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ :- दिग्रस शहराचे महान तपस्वी संत श्री घंटीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार (८ नोव्हेंबरला) रात्री १० वाजताच्या सुमारास यात्रेमध्ये दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीने चांगलीच खळबळ उडाली. यात्रेचा मुख्य परिसर असलेल्या वाल्मिक नगरात हाणामारी नंतर त्याचे रुपांतर चक्क दगडफेक व उभ्या मोटार सायकलची तोडफोड तसेच जाळपोळ पर्यंत गेल्याने पारंपरिक यात्रेला गालबोट लागले.

हे देखील पहा :

दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध परस्पर पोलिसात तक्रार दिली असून पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हजारो युवकांना घेऊन राडा घातल्याचे म्हटले आहे. हातात शस्त्र घेऊन यात्रेत धुमाकूळ घालत मेहतर समाजाच्या घरांवर दगडफेक केली. घरापुढे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड करत काही दुचाकी जाळून अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT