जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवार भोकसल्याने तरुण गंभीर जखमी
जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवार भोकसल्याने तरुण गंभीर जखमी लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवारीने भोकसल्याने तरुण गंभीर जखमी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालन्यातील टांगा स्टँड परीसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील एका व्यक्तीला तलवारीने भोकसल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावरती सामान्य रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हाणामारीच्या घटनेनंतर एका टोळक्याने परीसरात हुल्लडबाजी करून सराफा बाजारात, दूध मार्केट परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या भागासह टांगा स्टँड परीसरात तणावपूर्ण शांतता असून या भागातील व्यापाऱ्यांनी (Merchants) आपापली दुकानं बंद केली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हे देखील पहा -

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टांगा स्टँड परिसरात कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान सध्या या भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम असून परीसरात तणावपूर्ण शांतता कायम आहेत तर व्यापाऱ्यांनी बंद केलेली दुकानं देखील उघडण्यात येत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये शांतिगीरी महाराज यांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज?

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT