दूध आणायला गेल्यानं नियमाचं उल्लंघन; गुन्हा दाखल झाल्यानंं भविष्य अंधारात  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

दूध आणायला गेल्यानं नियमाचं उल्लंघन; गुन्हा दाखल झाल्यानंं भविष्य अंधारात

राज्यभरात कोरोना काळात नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हजारो व्यक्तींविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : राज्यभरात कोरोना Corona काळात नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हजारो व्यक्तींविरोधात पोलिसांनी Police कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईद्वारे केवळ कोट्यावधींचा दंडच वसूल केला गेला नाही, तर हजारो लोंकावर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भांदवि कलम १८८ प्रमाणे खूप जणांवर गुन्हे Crime दाखल करण्यात आले आहेत.

दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आता सर्वसामान्यांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या राकेशला इन्फोसिस Infosys सारख्या मोठ्या कंपनी मधून नोकरीची ऑफर आली आहे. दारिद्रय पाचवीला पुजलेलं असताना, देखील मोठ्या कंपनीतून आलेली नोकरीची ऑफर आनंद देणारी होती. मात्र, कोरोना काळात दाखल झालेल्या, एका गुन्ह्यामुळे राकेशच्या नोकरी मिळवण्यात अडचणी निर्माण झाले आहेत.

हे देखील पहा-

सोलापुरातील Solapur इंदिरा वसाहत परिसरात राकेश आपल्या आजी सोबत राहत होता. मागच्या वर्षी आजोबांना निमोनिया Pneumonia झालेला आणि आजीला चालता येत नाही. त्यासाठी तो सकाळी चहासाठी दुध आणायला राकेश घराबाहेर पडला होता. दुधाची पिशवी घेतली, घराकडे येत असतानाच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना विनवण्या केले होते. मात्र, एका शब्दाने ही पोलिसांनी त्याचे ऐकलं नाही.

यामुळे राकेशचे संपूर्ण भविष्यचं धोक्यात आले आहे. ही व्यथा एकट्या राकेशची नाही, तर केवळ सोलापूर शहराचा जरी विचार केले तरी पोलिसांनी हजारो गुन्हे कोरोना काळात दाखल केले आहेत. कोरोना काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी सोलापूर शहर City पोलिसांनी ५ हजार ३० गुन्हे दाखल केले आहेत. ज्या माध्यामातून ११ हजार पेक्षा जास्त लोकांवर कारवाई कऱण्यात आली आहे.

केवळ गुन्हेच नाहीच तर मास्क Mask न वापरलेल्या लोकांना १ कोटी ९६ लाखांचा दंड देखील सोलापूर पोलिसांनी केला आहे. शैक्षणिक दाखले, पासपोर्ट Passport, नोकरीच्या ठिकाणी अनेकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. मात्र, कलम १८८ नुसार गुन्हे दाखल असल्याने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढताना अडचणी निर्माण होत आहेत. राजकीय किंवा सामाजिक आंदोलने करत असताना, दाखल झालेले किरकोळ गुन्हे राज्यशासनाच्या आदेशानुसार काही वर्षांनी रद्द केले जातात.

त्याच पद्धतीने हे देखील गुन्हे माघारी घेण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. गुन्हेगाराचा गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट व्हावी. या हेतूने गुन्हे दाखल केले जातात. मात्र, कोरोना नियमांचा भंग केल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे तरुणांचे भविष्यचं टांगणीला लागले आहे. यामुळे राज्यशासनाने कायदाचा धाक निर्माण करत असताना या तरुणांच्या भविष्याचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील प्रेम कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT