Sahitya Sammelan Controversy 
महाराष्ट्र

Vinod Kulkarni : साहित्य संमेलनाला पुन्हा गालबोट! विनोद कुलकर्णींवर हल्ला, तोंडाला काळे फासले

Sahitya Sammelan Controversy: साताऱ्यात सुरू असलेल्या साहित्य संमेलनात मोठा वाद निर्माण झाला असून मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

Namdeo Kumbhar

Vinod Kulkarni attacked at Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना काळे फासण्यात (black ink attack at literary conference Maharashtra) आलेय. या घटनेनंतर साताऱ्यात अन् महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर विनोद कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास करावा, माझे प्राण गेले तरी मला पर्वा नाही, असे कुलकर्णी म्हणाले. (Satara Sahitya Sammelan controversy news)

मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर साताऱ्यात हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आलेय. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ला झालाय. हल्लेखोरांनी काळा बुक्का टाकला. विनोद कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले. हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना स्वाभिमानी संघटनेने काळे फासल्याचे बोलले जात आहे.

माझ्यावर हल्ला का झाला? याबाबत मला कोणताही माहिती नाही. माझा प्राण गेला तरी मला पर्वा नाही. पण मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी आरोपींना शोधावे, अशी प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी दिली. साताऱ्यात ते बोलत होते. विनोद कुलकर्णी यांच्यावर साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ला झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामधील कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : पुन्हा भूकंप होणार? शिंदेंची शिवसेना फुटणार? खासदाराच्या त्या दाव्याने राजकारणात खळबळ

Saree With Matching Mangalsutra Design: कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र उठून दिसेल? हे आहेत लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 पॅटर्न

Homemade Paneer : बाजारात मिळणारे पनीर बनवा आता घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Bigg Boss Marathi 6 : कोण Safe अन् कोण Danger Zone मध्ये? बिग बॉसच्या घरात पार पडला नॉमिनेशन टास्क, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT