Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडमधील अख्ख्या गावाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; ग्रामपंचायतीतच ठराव, कारण वेगळंच!

Lok Sabha Election 2024: आतापर्यंत आपण बीड जिल्ह्यातील एक ना अनेक बातम्या पाहिल्या आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह ओबीसी आरक्षण बचाव यासाठी एक ना अनेक आंदोलने पाहिले आहेत.

विनोद जिरे

Beed News:

आतापर्यंत आपण बीड जिल्ह्यातील एक ना अनेक बातम्या पाहिल्या आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह ओबीसी आरक्षण बचाव यासाठी एक ना अनेक आंदोलने पाहिले आहेत. आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्काराचे भाष्य देखील झाले. एकीकडे हे सगळं सुरू असताना, दुसरीकडे बीडच्या सुर्डी गावात मोबाईल रेंज आणि टॉवर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा आता नागरिकांनी दिलाय.

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं साधन म्हणजे मोबाईल आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आलंय. एका क्षणात कुठे काय सुरू आहे? हे याच मोबाईल मधून पाहायला मिळतं. चांगलं काम असो की इतर कोणतेही काम या मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. मात्र एकीकडे देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे मात्र बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या सुरडी गावात आजतागायत एकही टावर उभा नाही. यामुळे मोबाईल असूनही रेंज नसल्याने ग्रामस्थांचे अनेक कामे खोळंबली जात आहेत. यामुळे आता सुरडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्येच मंजूर करून घेतलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंटरनेट आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल ही अतिशय जवळची वस्तू आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासह इंटरनेटच्या या जगात, कुठं काय सुरू आहे, हे मोबाईल वरूनच माहिती मिळते. मात्र तोच मोबाईल गावात आल्यावर काम करत नाही. यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत या मोबाईलची रेंज डोकेदुखी बनली आहे. तर ही रेंज मिळवण्यासाठी गावात टॉवर उभाराव यासाठी गेल्या 20 वर्षापासून ग्रामस्थ पुरावा करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत टॉवर उभा करण्यात आलं नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.  (Latest Marathi News)

याविषयी सैन्य दलात काम करणाऱ्या जवानाने म्हटलं आहे की, आजकाल संपुर्ण जगभरात रेंज आहे, मी बाॅर्डवर असून तिथं देखील रेंज आहे. पण माझ्या गावात रेंज नाही, याची मला खूप खंत आहे. माझा कुटुंबाशी संपर्क व्हावा म्हणून मला माझं कुटूंब मला आष्टी शहरात स्थाईक करण्याची वेळ आली आहे. तेव्हा तात्काळ टावर बसून द्यावे, अशी प्रतिक्रिया सैनिक सुभाष गर्जे यांनी व्यक्त केली आहे.

आष्टी मतदार संघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सुरेश धस आहेत. हे दोघेही सत्ताधारी पक्षातील आहेत. मात्र हे दोन आमदार नावाला आणि एकही नाही कामाला, अशी चर्चा गावात सुरू आहे.

दरम्यान, एकीकडे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आंदोलन यासह विविध आंदोलनाने बीड जिल्हा हा गाजत आहे. आरक्षणाची मागणी घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांना इशारा देत बहिष्कार टाकण्याचे भाष्य देखील आंदोलकांकडून केले जात आहेत. मात्र एकीकडे आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरीकडे आता मोबाईल टॉवरच्या मुद्द्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वीच बीड जिल्ह्यात घमासान सुरू झालंय. त्यामुळं आता या गावाला टॉवर मिळणार का ? हेचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT