kolhapur news, Kolhapur Sulkud Water Supply Scheme : saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : पाणी आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या...., सुळकुड ग्रामस्थ घुसले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात, आजच महत्त्वपूर्ण बैठक

Kolhapur Sulkud Water Supply Scheme : ऐन पावसाळ्यात आता पाणी प्रश्न पेटला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : इचलकरंजी येथील सुळकुड पाणी योजनेला (Sulkud Water Supply Scheme) विरोध करण्यासाठी आज (शनिवार) सुळकुड ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होऊ देणार नाही असा पवित्रा घेत घाेषणाबाजी करत आंदोलक ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. दरम्यान इचलकरंजी थेट पाईपलाईन प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक हाेणार आहे. (Maharashtra News)

इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र आता त्याला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे.

यासाठीच आज कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik), भाजप नेते समरजितसिंह घाटगे (samarjeet ghatge), माजी आमदार संजयबाबा घाटगे (sanjay baba ghatge) यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीला दूधगंगा पाणी बचाव समितीचे सदस्य देखील उपस्थित असणार आहेत. आठ दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातल्या नागरिकांनी एक बैठक घेऊन कागल मधील नेत्यांनी आमच्या या हक्काचं पाणी देण्यासंदर्भात विरोध केला नाही तर आम्ही कर्नाटकात सामील होऊ असा सज्जड इशाराच दिला होता. त्यानंतर आता लगेचच ही बैठक होत आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT