Raigad
Raigad Saam Tv
महाराष्ट्र

Raigad: मळा गावाला रस्ता देता का रस्ता, 40 वर्षांपासून रस्त्यासाठी मळाकरांचा संघर्ष

वृत्तसंस्था

राजेश भोस्तेकर

रायगड: गावातील रस्ता चांगला असेल तर विकासाची गंगा वाहते. मात्र रस्ता नसेल तर गावाचा विकास खुंटतो. अशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील मिळकतखार मळा गावाचाही विकास रस्त्यामुळे खुंटला आहे. 40 वर्षांपासून मळा ग्रामस्थ हे रस्त्यासाठी झगडत आहेत. मात्र आश्वासनाशिवाय त्याच्या पदरात काहीच पडलेले नाही. रस्ता नसल्याने गावातील मूलभूत सुविधाही पोहचत नाहीत. आमचा रस्ता करा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाला मत देऊन लोकप्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार मळा ग्रामस्थांनी केला आहे. कोणी रस्ता देता का रस्ता अशी बोलण्याची वेळ या मळा ग्रामस्थांवर आली आहे (Villagers in Mala village struggle for road from 40 years in Raigad).

अलिबाग (Alibaug) तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 घरांचे दीडशे लोकसंख्या असलेले गाव आहे. मिळकतखार गावातील नागरिक यांनीच गावात घरे बांधण्यासाठी जागा नसल्याने शेतावर आपले घर बांधले आणि मळा हे गाव वसले. 2002/03 साली नाबार्ड मार्फ़त ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत गावात जाणारा साडे दहा लाख खर्च करून रस्ता बांधला होता. मात्र मळा गावाच्या वेशीवर शेती असल्याने बांधावरून जाणारा रस्ता हा अपूर्णच ठेवला आहे. काही शेतकऱ्यांचा रस्ता देण्यास विरोध आहे. निवडणुकी काळात प्रचाराला येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी रस्ता करून देणार म्हणून आश्वासन देतो. मात्र निवडणूक झाली की जैसे थी परिस्थिती.

गावात जाणारा रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती, गरोदर माता यांना गावातील व्यक्ती उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन त्यानंतर वाहनाने रुग्णालयात नेत आहेत. पाण्याचीही समस्या मोठी असल्याने गावात नळ असूनही आठ दिवसाने पाणी येत आहे. टँकरने पाणी आणताना एक किलोमीटर वरून महिलांना डोक्यावर हंडा घेऊन शेताचा बांध तुडवत घरी यावे लागते. पावसाळ्यातही रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेचीही समस्या गावात भेडसावत आहे. गावात घराचे काम करायचे झाल्यासही अधिकच खर्च रस्त्याविना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. एक ना अनेक अडचणींचा सामना मळा ग्रामस्थांना करावा लागत आहे. मात्र शासन दरबारी रस्त्याबाबत निवेदन देऊनही प्रश्न अधुराच आहे.

गावात जाणारा रस्ता नसल्याने चारचाकी वाहनेही ग्रामस्थांना गावाच्या बाहेर ठेवावी लागत आहेत. तर दुचाकीवरून येतानाही कसरत करीत गावात यावे लागत आहे. शाळकरी मुलांनाही शेताच्या बांधावर कसरत करत शाळेत जावे लागत आहे. रस्त्याची आमची समस्या सोडवावी आणि आमच्या गावाचा खुंटलेला विकास दूर करावा अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Election) नेत्यावर बहिष्कार आणि नोटाला मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी मळा ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT