खासदार डॉ. सुजय विखे पाटील. 
महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदार सुजय विखे हे लंकेंना घाबरलेत

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. खास करून ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला, तेथील नेत्यांनी उचल खाल्ली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही मतदारसंघात दौरे करू लागले आहेत. शिवसेना नेत्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कंबर कसली आहे.

खासदार विखे पाटील यांनी सर्व तालुक्यांचा नुकताच दौरा केला. कर्जत-जामखेडमध्ये गेल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. केंद्र सरकारने केलेल्या कामांचे तुम्ही क्रेडिट घेऊन आपल्या नावावर खपवू नका, असा त्यांच्या टीकेचा रोख होता. तर भाजपचेच दुसरे नेते राम शिंदे यांनीही कार्यपद्धतीवरून रोहित पवार यांना धारेवर धरले. एकदाच मतदारसंघात येतात आणि त्याचे आठवडाभर फोटो टाकत बसतात, अशी त्यांची टीका होती.Vikhe Patil deliberately criticizes Nilesh Lanke

पारनेरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रसचे नीलेश लंके हे आमदार आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात मोठे काम केले आहे. देशभरातून त्यांची वाहवा झाली. लंके यांच्या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी भविष्यात फायदा घेऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यांना नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या कारणावरून आमदार लंके यांच्यावर टीका केली जात असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

खासदार विखे पाटील यांना खरे तर कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांची तर पारनेरमध्ये नीलेश लंके यांची भीती वाटत आहे. त्या भितीपोटीच ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याचा लंके समर्थकांचा दावा आहे. लंके छोट्याशा कामाचीही प्रसिद्धी करतात. आम्ही ढिगाने काम करतो, तरीही त्याची कुठे वाच्यता करीत नाही, असा टोमणा विखे पाटील यांनी मारला होता.Vikhe Patil deliberately criticizes Nilesh Lanke

मध्यंतरी खासदार विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आमच्या मतदारसंघात नाक खुपसू नका, असे लंके म्हणाले होते. तेव्हापासून खासदार विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यात अनबन आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT