Vijay Wadettiwar|Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : 'अशा वाऱ्यामुळे कोकणातला नारळही पडत नाही'; राजकोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Vijay Wadettiwar On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ४५ किमी वेगाने वारे वहात होते, त्यामुळे राजकोटमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा दावा केला होता, त्यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Sandeep Gawade

४५ किमी वेगाने वारे वाहले तरी कोकणातला नारळ पडत नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात वादळामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्रात असे कित्येक पुतळे आहेत, जे वादळ वाऱ्याचा सामना करत कित्येक दशकं जसेच्या जसे उभे आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा अजब असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला होता. त्याचे राज्यात तीव्र पडसाद उपटले आहेत. दरम्यान काल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देताना, जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. मात्र कोकणात पाऊस आणि जोरदार वारे वाहात होते. तासी ४५ किमी वेगावे वारे वहात असल्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा दावा केला होता.

खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर इतक्या निकृष्ट दर्जाचं काम कसं होऊ शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र निकृष्ट दर्जाचं काम करून यांनी महाराजांचा पुतळा यांनी पाडला आहे, भविष्यात महायुतीचे हे भ्रष्टाचारी सरकार याच मातीत गाडले जाईल, असा घणाघातही त्यांनी केला. राज्यातील सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याचा बदला घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलं होतं. प्रत्येक शिवप्रेमींचा ऊर अभिमानानं भरून आला होता, मात्र अवघ्या 8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ आली आहे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर जयंत पाटील यांनी, जे काम औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत जमलं नाही, ते या महायुती सरकारने करून दाखवलं आहे, असा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT