Vijay Wadettiwar  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Vijay Wadettiwar News: भाषणात ओरडून सांगता शेतकऱ्यांचं सरकार आहे पण..., विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Buldhana Vijay Wadettiwar News: राज्यात शेतऱ्यांच सरकार आहे, असं मुख्यमंत्री भाषणात ओरडून सांगत असतात, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिट होऊन तीन दिवस झाले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे ढुंकून ही पाहिले नाही. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Buldhana Vijay Wadettiwar News

राज्यात शेतऱ्यांच सरकार आहे, असं मुख्यमंत्री भाषणात ओरडून सांगत असतात, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिट होऊन तीन दिवस झाले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्ह्याकडे ढुंकून ही पाहिले नाही. ज्या दिवशी हे नुकसान होत होतं त्या दिवशी तुम्ही आणि उपमुख्यमंत्री तेलंगणा निवडणुक प्रचारात व्यस्त होता. तिकडून आल्यावर तरी राज्यातील शेतकऱ्यांची विचारपूस केली का? तुम्ही शेतकऱ्यांचं सरकार फक्त भाषण आणि जाहिराती पुरतं लिमिटेड ठेवलं आहे. शेतकरी जगला काय अन् मेला काय त्याच्याशी तुम्हाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही देणेघेणे नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी आज बलढाणा जिल्ह्याचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहागीर , सावरगाव माळ याठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनशेतकऱ्यांशी साधला संवाद साधला.

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक गारपीट ने जिल्ह्यातील 36 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल आहे. त्याचे पंचनामे सुरू आहेत. मात्र जिल्ह्यातील देऊळगाव राजा , सिंदखेड राजा, लोणार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांसह फळबागांचे ही मोठ नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी राज्यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. शिवाय सरकारकडून भरघोस मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निविराला शहीद घोषित करण्याची योजना नाही. पंजाब सरकारने शहीद अग्निविरला एक कोटी दिले मात्र आपल्या राज्य सरकार ने फक्त दहा लाख, हा अवमान आहे. याबाबत सरकार ची भूमिका काय याबाबत मी सरकारला विचारणार. सर्व प्रशासन व यंत्रणा कंत्राटी असल्याने कुणीही काम करत नाही. सरकार व मंत्री सुद्धा कंत्राटी आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांना सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना द्यायला वेळ नाही. सामान्य माणसाला द्यायला यांना वेळ नाही मात्र सरकारच्या तिजोरीतून पैसे कसे काढता येतील याकडे त्यांचं लक्ष आहे.

आरक्षणाचा मुद्दा हा सरकार प्रायोजित आहे. भ्रष्टाचाराकडे लक्ष जाऊ नये म्हणून मराठा व ओबीसित सरकार ने वाद लावला व जनतेच लक्ष त्याकडे वेधलं. त्यांच्या भ्रष्टाचाराकडे जनतेच लक्ष जाऊ नये म्हणून सरकार प्रायोजित हा आरक्षणाचा वाद आहे. सरकार मिळकती पेक्षा दहा पट खर्च करत आहे. टक्केवारी घेणं हे सरकार काम करत आहे. राज्यात अनेक प्रश्न असताना कुठल्याच धोरणावर राज्य सरकारच लक्ष नाही.

दक्षिण भारतात भाजपा साफ झालं आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी बदल होतो. मात्र राजस्थानात ही आम्हीच येणार आहोत. सध्या बदलाच वातावरण आहे. दहा पैकी आठ लोक केंद्राला शिव्या देतात. भाजपकडे आता फक्त दोन चार राज्य राहिली आहेत आणि ते म्हणतात मोदींचा करिष्मा आहे. मात्र आता 2024 ला भाजपा सरकार जाणार हे नक्की असल्याचा दावाही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? पगार कितीने वाढणार? वाचा

Jalna : तलाठ्याला जालन्यात बेदम मारहाण, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाईवेळी राडा

Mumbai Horror: मुंबईत माणुसकीचा कळस गाठणारी क्रूरता, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT