BJP leader Raju Patil Raje addresses media over ₹100 crore defamation case against Vijay Wadettiwar in Washim Saam Tv
महाराष्ट्र

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; नेमके प्रकरण काय?

Vijay Wadettiwar 100 Crore Defamation Case Washim Court: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपचे राजू पाटील राजे यांनी 100 कोटींचा मानहानी दावा दाखल केला आहे. वाशिम न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

वाशिम: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून तो वाशिम जिल्हा न्यायालयाने स्वीकारला असल्याची माहिती भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख भरत राजे उर्फ राजू पाटील राजे यांनी वाशिम इथ पत्रकार परिषदेत दिली.

पाटील राजे यांनी सांगितले की, 28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर माझ्याविरोधात गंभीर आरोप केले होते. वाशिममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही.तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे सांगत त्यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी 3 जानेवारी 2026 रोजी विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून 15 दिवसांत खुलासा करण्यास आणि सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत ना खुलासा झाला ना माफी मागण्यात आली. त्यामुळे 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून प्रकरणाचा दावा क्रमांक 13/2026 आहे.

पाटील राजे म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून याविरोधात न्यायालयात लढा देणार आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी. या प्रकरणामुळे राजकारण तापले असून विजय वडेट्टीवार यांनी अद्याप तरी कुठली प्रतिक्रिया दिली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT