सत्ता कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही; वडेट्टीवारांचा राणेंना टोला Saam Tv
महाराष्ट्र

सत्ता कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही; वडेट्टीवारांचा राणेंना टोला

प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसीची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: ओबिसींमुळे मंत्री झालो असून मंत्रीपद ही काही बापाची खाजगी जहागीरदारी नाही. त्यामुळे ओबीसीसाठी मंत्रीपद खपले तरी चालेल असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे. जालन्यातील दादडगाव येथे मंडल आयोग लागू दिनानिमित्त सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आम्ही राज्यात वेटींगवर आहोत असं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. राणे वेटींग वर आहेत मग आम्ही काय ऑक्सिजनवर आहोत का असा टोला लगावत सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही असं सांगायला ते विसरले नाहीत.

राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलीय. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक ब वर्ग निकाल जाहीर

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT