Vijay Vadettiwar Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Government Hospital: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे : विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar on Nanded Hospital Case: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय.

Bharat Jadhav

Nanded Government Hospital Death Cases:

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होतेय. राज्य सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. नांदेडमधील घटनांवर सरकारवर बोलताना वडेट्टीवार यांनी शासकीय रुग्णालयामधील अभावांचा पाढा वाचला. (Latest News)

ठाण्यामधील घटना ताजी असताना नांदेडमधील घटना घडलीय. नांदेडमधील मेडिकल कॉलेजमध्ये २४ जणांचा मृत्यू त्यात १२ नवजात बालके होती. हे शासन यासाठी जबाबदार आहे. या घटनांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये पूर्णवेळ डीन नाही. तेथील अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील औषध पुरवठा बरोबर नाही. तसेच रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही. जिल्हा निधी रुग्णालयाला मिळालं नाही. सरकार फक्त योजनांचा पाऊस पाडते, मात्र लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप विजय वडेवट्टीवार यांनी केलाय.

डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात अवघ्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. औषधांचा तुटवडा आणि वेळेत उपचान न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील खोके सरकार फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घर फोडा, पक्ष फोडा यांच्यात ते व्यस्त असतात. यामुळे सर्वसामान्य जनतेपासून वास्तव्यतेपासून दूर आहे. या सगळ्या २४ मृत्यूला हे ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदार आहे.." अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजा गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT