Syed Khan, Parbhani Hingoli MLC Election Saam TV Marathi
महाराष्ट्र

MLC Election : परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला, श्रीकांत शिंदेंच्या विश्वासूला संधी; नेमकं गणित काय?

Syed Khan, Parbhani Hingoli MLC Election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या खान यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

विशाल शिंदे, परभणी प्रतिनिधी

Parbhani Hingoli MLC Election 2026 : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्याक समाजातील युवा चेहरा सईद खान यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजले जाणारे सईद खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील अल्पसंख्याक समाजाला थेट प्रतिनिधित्व देण्याचा संदेश महायुतीकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजातही पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलेली ही राजकीय खेळी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सईद खान यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोलीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अल्पसंख्याक समाजात या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.

कोण आहेत सईद खान?

गेल्या १५ वर्षांपासून ते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत.

९ जुलै २०२३ पासून त्यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक, राजकीय तसेच अल्पसंख्याक समाजाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

राज्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील सुमारे ९०० अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींचा त्यांनी शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत त्यांनी ५५,००० मते मिळवली होती.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अल्पसंख्याक समाजासाठी सुमारे ५,६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यामध्ये शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विकास महामंडळाचा निधी आणि इतर विविध योजनांचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पाथरी विधानसभा मतदारसंघात सुमारे ९५० कोटी रुपयांचा निधी आणून त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत.

२०२५ च्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता मिळवून दिली. यात पाथरीचे नगराध्यक्ष व ९ नगरसेवक निवडून आणले. तसेच सोनपेठ येथे आघाडी करून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व १० नगरसेवक, तर मानवत मधील ५ नगरसेवक निवडून आणण्यात मोठे यश मिळवले. २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातून २ जिल्हा परिषद सदस्य व ४ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचे ९ संचालक निवडून आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Weekly Horoscope: तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT