महाराष्ट्र

Nashik BJP News: नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ कायम, अंतर्गत धुसफूस देखील आली समोर

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांना पक्षाने उमेदवारी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

>> सुशील थोरात

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, पक्षाशी संबध नसलेल्या बाहेरील कोणालाही तिकीट देऊ नये, अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांना पक्षाने उमेदवारी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. (Nashik News)

भारतीय जनता पक्षाच्या मूळ विचारधारेशी सहमत असणारा आणि पक्षाच्या मुळ विचारधारेवर काम करणारा उमेदवार पक्षाने या निवडणुकीत द्यावा, अशी भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवली असल्याचं भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड हे या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र खासदार सुजय विखे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी थेट बावनकुळे यांची भेट घेऊन या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती.

त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल यामध्ये संभ्रम असतानाच आता काँग्रेसच्या एका मोठ्या युवक नेत्याचे नाव समोर येत असून इच्छुक उमेदवारांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आज सायंकाळीपर्यंत या काँग्रेसच्या युवा नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT