पर्यटनाला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बिबट्याला दगड मारतानाचा व्हिडीओ व्हायरल  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

पर्यटनाला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बिबट्याला दगड मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

पर्यटनाला गेलेल्या 3 पोलिस कर्मचाऱ्यांद्वारे 2 बिबट्यांना दगड मारून हुसकावून लावण्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली असून वन्यप्रेमींद्वारे पोलिसांच्या या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : पर्यटनाला गेलेल्या 3 पोलिस कर्मचाऱ्यांद्वारे 2 बिबट्यांना दगड मारून हुसकावून लावण्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली असून वन्यप्रेमींद्वारे पोलिसांच्या या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही ते पवणारखारी रस्त्यावर सदर घटना घडली असून, वन्य प्राण्यांना नाहक त्रास देतानाच पोलिसांचा हा व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भंडारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दगड मारणारे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील पोलिस स्टेशनचे 3 कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

भंडारा जिल्ह्यात पर्यटनासांठी गेलेल्या गोबरवाही पोलिसांद्वारे बिबट जोडप्याला (नर-मादी) दगड मारून त्याला हुसकावून लावत असतानाच गोबरवाही पोलिसांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यात काही पोलिस खाजगी गाडिने गोबरवाही ते पवणारखारी रस्त्यावर फिरायला गेले होते. दरम्यान त्यांना 2 बिबटे झाड़ावर बसलेले आढळले.

या पोलिसांनी गाडीतून उतरत चक्क बिबट्यांना दगड मारून हुसकावून लावण्यास सुरुवात केली. यात दगडाचा मार सहन न झाल्याने हे बिबटे झाडाखाली उतरून पळू लागले. या सर्व घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी स्वतः रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच याबाबत वन्य प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या बाबत भंडारा पोलिस अधीक्षकांसह उपवनसंरक्षकांकडे वन्यप्रेमींनी तक्रार केली आहे. शिवाय या पोलीस कर्मचाऱ्यांवर वाइल्ड लाइफ एक्ट 1972 नुसार कारवाई ची मागणी करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT